नवी मुंबई (वृत्तसंस्था) – प्रख्यात लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांना 2020 सालचा रिचर्ड डकिन्स पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळालेले ते पहिले भारतीय ठरले आहेत. मानवी मुल्यांची जपणूक करून धार्मिक भावनांची योग्य चिकीत्सा केल्याबद्दल तसेच मानवी प्रगतीला पुरक कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
या बातमीचे स्वागत करताना त्यांच्या पत्नी अभिनेत्री शबाना आझमी यांनी म्हटले आहे की आज देशातील धर्मनिरपेक्षतेचे तत्व धोक्यात आले असतानाच्या काळात त्यांना हा पुरस्कार मिळण्यास खूप महत्व आहे. जावेद अख्तर यांनी तर्काधिष्टीत विचाराधारेने आजवर जी सेवा केली त्याच्या कार्याची ही पावती आहे असेही त्यांनी म्हटले आहे. या वृत्ताचे अभिनेते अनिल कपुर, दिया मिर्झा अदिंनीही स्वागत केले आहे.