नवी मुंबई (वृत्तसंस्था) – ‘तुमचा लॉकडाऊन एक्सिट प्लॅन काय ?’ असा सवाल राज ठाकरे यांनी राज्य सरकारला विचारला होता. सरकारकडे या प्रश्नाचं तेव्हाही उत्तर नव्हतं आणि आजही नाही. लोकांना सरकारने वाऱ्यावर सोडून दिलं आहे. कसलेच नियोजन व धोरण दिसत नाही, अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
राज्य सरकारच्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यात लॉक डाऊनचे काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईत रस्त्यावर गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबईत बेस्ट बस सुद्धा सुरु झाल्या. मरिन ड्राईव्ह आणि चौपट्यांवर लोकांनी मोट्या प्रमाणात गर्दी केली आहे. त्यामुळे सरकारने लोकांना वाऱ्यावर सोडून दिलं असल्याचा आरोप मनसेने केला आहे.