पहुर (प्रतिनिधी) – जामनेर तालुक्यातील तोंडापूर गावी काल सायंकाळी पोलीस अधीक्षक डॉक्टर पंजाबराव उगले अप्पर पोलीस अधीक्षक गोरे पाचोरा उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पहुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश परदेशी पोलीस उपनिरीक्षक अमोल दिवटे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर बाविस्कर जगदीश चौधरी या पथकाने गुप्त माहितीवरून येथील दारू अड्ड्यावर धाड टाकून तोंडापूर गावातील देशी-विदेशी व गावठी हातभट्टीची दारूविक्री करीत असताना काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गावातील दोन ठिकाणी छापा मारून आरोपी राजेंद्र पुंडलिक चांदेकर यांच्या ताब्यातून एकूण पंधरा बाटल्या विदेशी दारू जप्त करण्यात आली दुसरा आरोपी श्वेतांबर गणेश वाघ त्याच्या ताब्यातून दोन हजार रुपये किमतीची प्लास्टिक पिशवीमध्ये वीस लिटर गावठी दारू मुद्देमाल नष्ट करून गावठी विक्रीचा अड्डा उद्ध्वस्त केला पण विरोधात पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली या कारवाईमुळे अवैध धंदे चालकात घबराट निर्माण झाली असून अवैध धंदे विरोधात पवार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश परदेशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी धडक मोहीम राबवली असून या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.