मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव वाढतच असल्याने राज्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. संपूर्ण देशात संचारबंदी असल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थिती भारतीय डाक विभागाने अत्यंत महत्पूर्ण निर्णय घेतला आहे. डाक विभागाने वयस्कर आणि अंपग पेन्शन धारकांना घरपोच पेन्शन देण्याची व्यवस्था केली आहे. वयस्कर आणि अंपग धारकांनी डाक विभागाशी संपर्क साधावा असे अवाहन डाक विभागाने केले आहे. अधिक मदतीसाठी डाक विभागाच्या विभागीय कार्यालयातील (दूरध्वनी क्रमांक 0241-2355010) व प्रधान डाकघर कार्यालय ,नगर ( दूरध्वनी क्र. 0241-2355036) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांना बँकेत जाऊन देवाण घेवाण करता येत नाही अशा नागरिकांसाठी डाक विभागाने अशा ग्राहकांना पोस्टमान मार्फत एका वेळेस दहा हजार रुपये काढण्याची व्यस्था केली आहे. डाक विभागाच्या या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राज्यात लॉकडाऊन असल्याने दळणवळण सुविधा बंद करण्यात आल्या आहे.