चाळीसगाव (प्रतिनिधी)- येथील मारवाडी युवा मंचची शाखा, रोटरी क्लब मालेगाव व मौर्यानगर मित्र मंडळ (डेराबर्डी ) यांच्या संयुक्त सहकार्याने आणि खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या संकल्पनेतून नेत्र तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबीर दि. 11 मार्चरोजी धुळे रोड येथील साने गुरुजी प्राथमिक शाळा डेराबर्डी येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 210 नेत्ररूग्णांची तपासणी करण्यात आली.
उमंग शिल्पी परिवाराच्या अध्यक्ष सौ. संपदाताई पाटील यांच्या हस्ते शिबीराचे उदघाटन करण्यात अआल. प्रभाग क्रमांक एक व दोन आणि डेराबर्डी मधील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. 210 रुग्णांची तपासणी करण्यात आली व 11 रुग्णांना मालेगाव येथे शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले. मालेगाव येथील डॉक्टरांची टीम व मारवाडी युवा मंचचे समकित छाजेड , मौर्यानगर मित्र मंडळ तर्फे अनिल गोत्रे, प्रसाद चौधरी, गणेश पाटील यांनी या शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.