नवीदिल्ली (वृत्तसंस्था) –विशाखापट्टणम शहराजवळच्या एका केमिकल कंपनीच्या प्लांटमधून विषारी वायूची गळती झाल्यामुळे 13 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक अस्वस्थ आहेत. आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम शहराजवळ आर. आर. वेंकटापूरम परिसरात ही घटना गुरूवारी पहाटे घडली.
मृतांपैकी तीन मृतदेह कंपनीच्या प्लांटजवळ आढळून आले तर अस्वस्थ वाटत असल्यामुळे किंग जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांपैकी पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या परिसरातील लोकांना डोळ्यांमध्ये जळजळ होत असून श्वास घेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे या भागातील लोकांनी या ठिकाणापासून दूर जायला सुरुवात केली आहे. विशेषतः वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांना जास्त त्रास होत असल्याचं आढळून येत आहे.
पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिसरातील पाच गावं रिकामी केली आहेत. लोकांना मेघाद्री गेड्डा आणि इतर काही ठिकाणी नेण्यात येत आहे.
Greater Visakhapatnam Municipal Corporation (GVMC)
@GVMC_OFFICIAL
There is gas leakage identified at LG Polymers in Gopalpatnam. Requesting Citizens around these locations not to come out of houses for the sake of safety precautions.
451
7:28 AM – May 7, 2020
Twitter Ads info and privacy
303 people are talking about this
काही जण हा वायू नाकावाटे शरिरात गेल्यामुळे बेशुद्ध झालेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी एलजी पॉलिमर्स कंपनीत झालेल्या या गॅस गळतीची माहिती घेतली असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.







