मुंबई (वृत्तसंस्था) – बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आपल्या प्रयत्नांनी प्रत्येकाची मने जिंकत आहे असून तो आपल्या खर्चाने मजुरांना त्यांच्या घरी पाठवत आहे. मात्र, तो करत असलेले काम महाराष्ट्रातील शिवसेनेला आवडले नाही. शिवसेनेने अभिनेता सोनू सूद यांना भाजपचे प्यादे म्हटले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये पक्षाचे नेते संजय राऊत म्हणाले की, भाजप सोनू सूदचा वापर करून सरकारवर हल्ला करण्याची तयारी करत आहे.
सामनाच्या अग्रलेखात लिहले आहे की, महाराष्ट्रात सामाजिक कार्याची प्रदीर्घ परंपरा आहे. त्यात महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबा आमटे या महान सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे आणि आता आणखी एक व्यक्ती या यादीत सामील झाले आहेत, ती म्हणजे सोनू सूद. त्यांचे बरेच व्हिडिओ आणि फोटो पाहिले जात आहेत. मागचे पंधरा दिवस तो घाम गाळत, उन्हातान्हात रस्त्यावर वावरताना दिसत आहे.
संजय राऊत यांनी अग्रलेखात लिहले आहे की, लॉकडाऊन दरम्यान अचानक सोनू सूद नावाचा एक नवीन महात्मा तयार झाला आहे. परप्रांतिय मजुरांना त्यांच्या घरी पाठवत असून सध्या त्याची चर्चा जोरात सुरु आहे. तसेच लॉकडाऊनच्या काळात सोनू सूदने जे केले ते बहुधा केंद्र, राज्य सरकारला जमले नाही ते काम सोनू सूद करत आहे. एवढेच नाही तर राज्यपालांनीही त्याचे कौतुक केले.
संजय राऊत म्हणाले की, या मोहिमेमागे सोनू सूद यांचा फक्त एक चेहरा आहे. महाराष्ट्रातील काही राजकीय पक्ष उद्धव सरकारवर आरोप करण्यासाठी सोनू सूदचा वापर करत आहेत. हे लोक सोनू सूद ला महाबली, बाहुबली किंवा सुपरहिरो आहे असे चिंत्र संगवण्यात हे राजकीय पक्ष काही प्रमाणात यशस्वी झाले. मात्र, त्यांना राज्य सरकारच्या मदतीशिवाय काहीही करता आले नाही. संजय राऊत यांनी भाजपवर आरोप करताना म्हणाले की, भाजपच्या काही लोकांनी सोनू सूदला दत्तक घेतले व त्याला पुढे करून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला.
संजय राऊत यांनी एका स्टिंग ऑपरेशचा हवाला देत आरोप केला की, सोनू सूद पैशांसाठी काहीही करू शकतो. राऊत यांनी म्हटले की, याच्या पाठिमागे कोण आहे ? आता सोनू सूदचे नाव मन की बातमध्ये येईल. त्यांना पंतप्रधान मोदी यांच्या भेटीसाठी बोलावले जाऊ शकते, त्यानंतर ते दिल्ली, युपीमध्ये भाजपचा प्रचार करतील, असेही राऊत यांनी म्हटेल आहे.
शिवसेनेच्या या लेखावर भाजपने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपचे नेते राम कदम म्हणले की, सोनू सूदबाबत शिवसेनेचे विधान दुर्दैवी आहे. स्वत:चं सरकार कोरोना नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरलं आहे. हे खरं सोनू सूदवर आरोप केल्याने लपू शकणार नाही असा टोला राम कदम यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. सोनू सूद सारखे लोक माणुसकीसाठी पुढे येऊन गोरगरिबांना मदत करत आहेत, त्यांचे कौतुक करायचे सोडून त्यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत टीका करत आहेत. हाच तुमचा माणुसकीचा धर्म आहे का ? असा सवाल देखील राम कदम यांनी उपस्थित केला.