नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – हाजीपुरात वैशाली पोलिस आणि एसटीएफच्या संयुक्त कारवाईत पोलिसांनी हाजीपूर सोने लूट प्रकरणात दोन कुख्यात गुन्हेगारांसह चार जणांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या महिला गुन्हेगारांच्या नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी गुन्हेगारांकडून लुटलेले 8 किलो सोनं, 5 किलो गांजा आणि मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रे आणि बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. महत्वाची बाब म्हणजे पोलिसांनी हे सोने हँडपंपामधून जप्त केले आहे.
गेल्या वर्षी 23 नोव्हेंबर रोजी नगर पोलिस स्टेशन येथे असलेल्या सिनेमा रोडवरील मुथूट फायनान्स कंपनीच्या शाखेत गुन्हेगारांनी छापे टाकून 51 किलो सोने लुटले होते. यामुळे पोलिस विभागात खळबळ उडाली. वैशालीचे एसपी गौरव मंगला यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटीएफच्या पथकासह पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापे टाकत सोने दरोड्याचे मुख्य सूत्रधार धर्मेंद्र राय उर्फ धर्मेंद्र गोप आणि वीरेंद्र शर्मा यांना अटक केली. अटक केलेल्या गुन्हेगारांच्या सांगण्यावरून विविध ठिकाणी छापेमारी करत असताना पोलिसांनी लुटलेले सोनं आणि अवैध शस्त्रेही जप्त केली.
हातपंपात लपवून ठेवलं होतं सोनं
कुख्यात विजेंद्र शर्माच्या लालगंज बलुआ बसंत घरात पोलिसांनी छापा टाकला, यावेळी हातपंपात लपवलेले सोने ताब्यात घेण्यात आले. यावेळी पोलिसांनी हातपंप उखडून तेथून लपविलेले सोने जप्त केले. वीरेंद्र शर्माच्या भावाची बायको शांती देवीलाही अटक करण्यात आली. शांती देवीवर चोरीचा माल लपवून ठेवल्याचा आरोप आहे. समस्तीपूरच्या पटोरी येथे कुख्यात धर्मेंद्र गोप यांची महिला नातेवाईक एमपी देवीलाही पकडण्यात आले, तेथूनही पोलिसांनी लपविलेले सोनेही ताब्यात घेतले. एसपी यांनी सांगितले की, यावेळी दोन पिस्तूल, 10 गोळ्या, 5 किलो गांजा, 1.5 लाख रोख रक्कम जप्त केली आहे.
पोलिसांनी यापूर्वीही जप्त केलं 9 किलो सोनं
एसपीने संगितले कि, गेल्या वर्षी 2019 च्या नोव्हेंबरमध्ये गुन्हेगारांनी सोने लुटल्याची मोठी घटना घडवून आणली होती. याप्रकरणी यापूर्वी बर्याच गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून आतापर्यंत 51 किलो सोन्याच्या लूटातून 17 किलो सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, यापूर्वी 9 किलो सोने सापडले आहे. या प्रकरणात अद्याप इतर अनेक दरोडेखोरांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांकडून सतत कारवाई केली जात आहे. उर्वरित गुन्हेगारांनाही लवकरच अटक केली जाईल व लुटमारीचे सर्व सोनेही लवकरच सापडेल, असा दावाही त्यांनी केला आहे.
दरोडेखोरांनी अनेक राज्यात टाकले दरोडे
अटक केलेल्या गुन्हेगारांच्या चौकशीदरम्यान हे सर्व इतर अनेक राज्यात सोन्याच्या दरोड्याचा कट रचत असल्याचेही उघड झाल्याचेही एसपींनी सांगितले. ते म्हणाले की, अटक केलेले दरोडेखोर पश्चिम बंगाल, सिलीगुडी, धनबाद आणि दरभंगा येथे दरोडा टाकण्याचा विचार करीत होते, परंतु त्यानंतरच पोलिसांनी त्यांचा हेतू नष्ट करून त्यांना अटक केली आहे. एसपी म्हणाले की ही टोळी देशातील अनेक राज्यात लूटमार करीत आहे.