मुंबई (वृत्तसंस्था) – संपूर्ण जगात कोरोनाचा थैमान कायम आहे.त्यातच आता जगभरात कोरोनाचे 70 लाखांच्या जवळपास रुग्ण झाले आहेत. तर या कोरोनामुळे बळींची संख्या आता चार लाखांच्या वर गेली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोनाची लागण 69 लाख 73 हजार 427 लाख लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 4 लाख 02 हजार 049 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 34 लाख 11 हजार 118 रुग्ण बरे झाले आहेत.
वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात सहाव्या स्थानावर आला आहे. भारतात कोविडचे 246,622 रुग्ण आहेत. तर 6,946 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 120,981 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 118,695 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत 19 लाख 88 हजार 544 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 1 लाख 12 हजार 096 लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 40,465 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 284,868 इतकी आहे.
अमेरिकेनंतर ब्राझील कोरोनाबाधितांच्या आकड्यांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ब्राझीलमध्ये 6 लाख 75 हजार 830 कोरोनाबाधित आहेत तर 36,026 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये कोविड-19मुळं 27,135 लोकांचा मृत्यू झाला आहे. 288,390 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली चौथ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 33,846 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 234,801 हजार इतका आहे.