पुणे (वृत्तसंस्था) – मंचर -आमोंडी (ता. आंबेगाव) येथे गावठी दारू विकणाऱ्यास घोडेगाव पोलिसांनी रंगेहात पकडले आहे, अशी माहिती सहायक निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली. शंकर शिवाजी गोतारणे (वय 22, रा. शिंदेवाडी) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
आमोंडी गावच्या हद्दीत इनामवस्ती येथील घोडनदीच्या कडेला खडकडोह येथे एक व्यक्ती विना परवाना दारू विकत असल्याची खबर पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव यांना पेट्रोलिंग करीत असताना मिळाली.
त्यांनी त्वरित संबंधित ठिकाणी पंचासमक्ष जाऊन पाहणी केली असता गोतारणे दारू विकत असल्याचे दिसून आले. दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी त्यास पकडले.