जळगाव , गणेश काँलनी परीसरातील कारवाई
जळगाव (प्रतिनिध) शहरातील गणेश कॉलोनी परिसरात श्री कृष्ण कॉलोनी मधील भागवत दयाराम पाटील यांच्या राहत्या घरातील जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी पावणे दोन लाखाच्या मुद्देमालासह 12 जुगाऱ्यांना अटक केली
सदर हा पाटील घरात पत्याचा क्लब चालवीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती पोलिसांनी या धाडीत आरोपींच्या ताब्यातून 98,610 रोख रक्म व मोबाइल फोन असा एकुण 1,73,610 रु चा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपींना जामीनांवर सोडण्यात आले आहे. असुन सदर ही कारवाई जिल्हा पेठ पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाठ व डीबी पथकातील भटु नेरक,नाना तायडे, अविनाश जाधव,प्रशात जाधव,महेंद्र बागुल,यांनी ही कारवाई केली आहे.