चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगावात बेकायदेशीर प्रवेश करणाऱ्या तीन जणांविरुद्ध आज गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक ,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे व उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांनी ही कारवाई केली.
चाळीसगाव शहरात मालेगाव, नाशिक, औरंगाबाद, मनमाड येथून बेकायदेशीरपणे आलेले सुलतान अजित खान (वय 24 रा. प्लॉट नंबर 8 पवारवाडी चाळीसगाव ) इजाज शेख रहिमोद्दिन ( रा.चामुंडा माता मंदिराजवळ चाळीसगाव ), महेंद्र प्रभाकर भेंडेकर (रा.नारायणवाडी चाळीसगाव), सुनील घनश्याम नुनासे ( रा. पीर मुसा कादरी बाबा दर्गाजवळ चाळीसगाव ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हाधिकारी यांचे आदेश क्र.दंडप्र/01/कावी/2020/57 दि. 14 एप्रिल 2020 तसेच उपविभागीय दंडाधिकारी भाग चाळीसगाव यांचे आदेश क्रदंडप्र/काववी/554/2020 दि. 20/4/2020 जळगाव जिल्हा हद्दीत प्रवेश व निर्गमन करण्यास प्रतिबंध( सीमाबंदी)चे आदेश पारित केले.
असून या आदेशाचे उल्लंघन करून बाहेर जिल्ह्यातून चाळीसगाव येथे हे वरिल इसम विनापरवाना प्रवेश करून मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन भादवि क्र 188 प्रमाणे कार्यवाही करण्यात आली चाळीसगाव शहरातील नागरिकांनी बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकास आश्रय देऊ नये अन्यथा आपल्याविरुद्ध देखील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी तसेच बाहेर जिल्ह्यातून कोणीही चाळीसगाव शहरात प्रवेश केल्यास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला तात्काळ माहिती द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक (चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन) यांनी केले आहे.