जळगाव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघ संघटनेतर्फे जिल्हा परिषद जळगावमधील प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी विजय शांतीलाल पवार यांना राज्यस्तरीय समता आदर्श शिक्षण विस्तार अधिकारी पुरस्कार 2020 नुकताच जाहीर झाला आहे . त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. याबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील , उपशिक्षणाधिकारी डॉ. दिगंबर देवांग तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .