नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – सध्या देशभरात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू आहे. केंद्र सरकारने 17 मेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. मात्र 17 मेनंतर पुढे काय असा सवाल काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत सोनिया गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊनसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले. या बैठकीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेस खासदार राहुल गांधी हेदेखील सहभागी झाले होते.
ANI
✔
@ANI
After May 17th, what? and after May 17th, how? What criteria is Govt of India using to judge how long the lockdown is to continue: Congress interim President Sonia Gandhi during Congress Chief Ministers’ meeting. #COVID19
View image on Twitter
779
12:11 PM – May 6, 2020
Twitter Ads info and privacy
345 people are talking about this
एएनआय या वृत्तसंस्थेने दिल्यानुसार सोनिया गांधी यांनी लॉकडाऊन 3 चा कालावधी संपल्यानंतर पुढे काय? आणि कोणतं धोरण राबवणार आहोत? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यानंतर मोदी सरकारचं करोनाशी दोन हात करण्याचं धोरण काय आहे असा प्रश्न सोनिया गांधी यांनी विचारला आहे. सध्या देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. गेल्या 41 दिवसांत देशात कोरोनाबाधितांची संख्या 40000 च्या पुढे गेली आहे. मात्र यावर नियंत्रण आणणे अवघड जात आहे. दुसरीकडे लॉकडाऊन असल्याने सर्व कामं ठप्प झाल्याने रोजंदारीवर काम करणाऱ्यांचा हाल होत आहे. अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम दिसून येत असल्याने जनतेमध्ये चिंतेचे वातावरण आहे.