पुणे (वृत्तसंस्था) – राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी मोठी चूक केली आहे, त्यामुळे सोशल कोल्हापूर मीडियावर नेटकऱ्यांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा फडणवीस यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. फडणवीस यांनी लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना त्यांच्या स्मृतिदिन ‘सामाजिक कार्यकर्ते’ म्हणून संबोधले, त्यांनी असे ट्विट केले होते.
फडणवीस यांनी डिलीट केलेले ट्विट
दरम्यान, या प्रकरणी शाहूंच्या कोल्हापूरनगरीतून नागरिकांनी फडणवीस यांच्या या कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर देखील लोक संताप व्यक्त करत आहेत. चुक लक्षात आल्यानंतर फडणवीसांनी ट्विट डिलीट केले. आणि शाहू महाराजांबद्दल एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Devendra Fadnavis
✔
@Dev_Fadnavis
सामाजिक क्रांतीचे जनक वंचितांचे शिक्षण, हक्कांचा पुरस्कार करणारे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांना स्मृतिदिनी शत शत नमन!
Embedded video
1,232
1:39 PM – May 6, 2020
Twitter Ads info and privacy
612 people are talking about this
फडणवीस यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी
‘बहुजन समाजातील महापुरुषांची बदनामी करणं, ही येथील जुनीच खोड आहे. समस्त भारतीयांसाठी आदर्श असणाऱ्या लोकराजे राजर्षी शाहू महाराजांना यांना त्यांच्या स्मृतिदिन फडणवीस यांनी ‘सामाजिक कार्यकर्ते’ म्हणणे, हा आमच्या राजांचा अपमान आहे’ असा संताप नेटकरी व्यक्त करीत आहेत.








