पुणे (वृत्तसंस्था) – कराडमध्ये आणखी १० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सध्या तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ७० वर पोहचली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांच्या सहवासात आल्यामुळे या १० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या आता ९२ झाली आहे. अशी माहिती सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.