मुंबई (वृत्तसंस्था) – तब्लिगींना गोळ्या घालण्याचं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मागे घ्यावं, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. तब्लिगींमूळे भारतात कोरोनाच प्रमाण वाढलं आहे. त्यांना गोळ्या घालून मारायला हवं, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आठवलेंनी टीका केली आहे. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला चिर देणारं आहे. अशा पद्धतीने गोळ्या मारण्याची भाषा इंग्रजांच्या काळामध्ये होती, पण आता आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा मी विरोध करतो. यावर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे, असंही ते म्हणाले.