अमळनेर (प्रतिनिधी) – जगभरात कोरोना आजाराने थैमान घातलेले असताना आपल्या भारत देशाला सुद्धा ह्या विषाणूने आपल्या जाळ्यात ओढले आहे.परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्य सरकारच्या उत्कृष्ट व सुयोग्य नियोजनामुळे आपण कोरोनावर लवकरच मात करु त्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिजाऊ बहुद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा तथा भा ज पा नेत्या अॅड ललिता पाटील यांनी केले आहे.*
*इतर देशांच्या मानाने भारतात परीस्थिती नियंत्रणात असुन लाॅकडाऊन आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी असुन त्याला गंभीरपणे घेऊन वायफळ कारणासाठी बाहेर जाणे टाळावे.आपल्या कुटुंबात किंवा परिसरात कोणालाही सर्दी,खोकला,ताप यासारखी लक्षणे दिसल्यास त्वरीत शासकीय आरोग्य केंद्रात तपासणीसाठी पाठवावे तसेच माक्स आणि सॅनिटायझर व आवश्यक उपाययोजनांचा वापर करुन आपल्याला व देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन अॅड ललिता पाटील यांनी केले आहे.