मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले असतानाच अमेरिकेत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. न्यूयॉर्क शहरातील ब्रॉक्स प्राणिसंग्रलायात चक्क एका वाघाला कोरोनाची लागण झाली आहे. प्राण्यांना कोरोनाची बाधा होण्याचे हे जगभरातील पहले प्रकरण आहे.
२७ मार्च रोजी नदिया नावाच्या वाघाबरोबरच अन्य ६ वाघांना कोरोनाचे लक्षण आढळून आले आहेत. प्राणिसंग्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्राणिसंग्रालयातील एखाद्या कर्मचाऱ्यामुळेच या वाघांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता आहे. कारण १६ मार्च पासून हे प्राणी संग्रालय नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे. इतर भागातही प्राण्यांना कोरोनाची बाधा झाल्याच्या बातम्या आता समोर येत आहेत. दरम्यान डॉक्टरांनी कोरोना झालेल्या व्यक्तींना आपल्या पाळीव प्राण्यापासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. वाघाला कोरोनाची बाधा झाल्यानंतर भारतातील प्राणिसंग्रलायाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तर सर्व प्राणी संग्रालयात सीसीटीव्ही कॅमेऱ्याने नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.