मुंबई : राज्यात आज नव्या 552 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 200 झाली आहे. तर दुसरीकडे आज राज्यात 12 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबळींची संख्या ही 223 वर पोहोचली आहे.
यात सर्वाधिक मुंबईत 132 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत. त्याखालोखाल पुण्यात 49 जणांना कोरोनाची लागण झाली. परिणामी राज्यातील आकडा 4200 झाला आहे. आजपर्यंत 507 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, दिवसभरात 12 कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला.
तसेच आज 142 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यभरात 507 रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण 3 हजार 470 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
दरम्यान, आज राज्यात 12 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्ंयूपैकी मुंबई येथील 6 आणि मालेगाव 4 तर 1 मृत्यू सोलापूर मनपा आणि 1 मृत्यू अहमदनगर जामखेड येथील आहे. आजपर्यंत पाठिवण्यात आलेल्या 72,023 नमुन्यांपैकी 67,673 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 4200 जण पॉझिटिव्ह आले आहेत.