अमळनेर – शहरातील बंगाली फाईल भागात एका गुन्हेगाराचा चार ते पाच जणांनी लाकडी दांड्याने पूर्ववैमनस्यातून खुन केल्याची घटना आज आठ वाजेच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे अमळनेर शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. राकेश चव्हाण असे मृत झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर 10 गुन्हे दाखल होते. जळगाव जिल्हा कारागृहातून 18 जानेवारी 2020 ला लातूर जिल्हा कारागृहात वर्ग केलं होते. गैरवर्तवणूक केल्या प्रकरणी आणि आता दोन दिवसांपासून जामीनावर बाहेर आला होता. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपपोलीस अधीक्षक राजेंद्र ससाणे, पो.नि. आंबदास मोरे, तसेच पोलीस विभाग घटनास्थळी उपस्थित झाले असून पुढील कार्यवाही सूरु आहे.