जळगाव (प्रतिनिधी) – सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कित्येक लोकांना दोनवेळचे जेवण मिळणे कठीण असल्याची परिस्थिती उद्भवली आहे. याचकाळात येथील जळगाव जिल्हा कारागृहात बंदी लोकांच्या जेवणासाठी पुरेशा प्लेट्स, वाट्यां उपलब्ध नाही, हे लक्षात आल्यामुळे जळगाव रोटरी इस्टकडून जिल्हा कारागृहात जेवणाच्या 500 प्लेट्स व 600 वाट्या आज सायंकाळी 5 वाजता जळगाव कारागृहाचे प्रभारी अधीक्षक आशिष गोसावी यांना देण्यात आल्या.
यावेळी जळगाव रोटरी इस्टचे अध्यक्ष विनोद भोईटे पाटील, सचिव विरेंद्र छाजेड, प्रकल्प प्रमुख प्रितेश चोरडीया, डॉ. जगमोहन छाबडा,संजय गांधी, विजय कुकरेजा, अजय अग्रवाल, सुनिल लुला,रामचंद्र महाराज व प्रतिक चोरडिया तर जळगाव कारागृहातील तुरुंगधिकारी बी.एम.तडवी, सुभेदार जी.आर.शेलार हवलदार ठेपने हे उपस्थित