मुंबई (वृत्तसंस्था) – फटाक्यांनी भरलेलं अननस खाल्ल्यामुळे केरळमधील मल्लपूरम जिल्ह्यात एका हत्तीणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर, सर्वच स्तरातून संताप व्यक्त व्हायला लागला. अखेरीस केरळ सरकारने पावले उचलत पोलीस आणि वन-विभागातर्फे मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी खास ऑपरेशन आखले .

आणि या प्रयत्नांना अखेरीस यश आले आहे. कारण याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. याच संदर्भात दाक्षिणात्य अभिनेत्याने हा प्रकार स्थानिकांनी जाणूनबुजून न केल्याचं म्हटलं आहे. त्याने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत या घटनेविषयी त्याचं मत मांडलं आहे.

अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन ट्विट केले आहे की, हत्तीणीला मुद्दाम कोणीही घातक पदार्थ खायला घातला नव्हता. प्राण्यांपासून पिकांचं रक्षण करता यावं यासाठी शेतात असे अननस ठेवले होते. मात्र तोच अननस या गर्भवती हत्तीणीने खाल्ला. हे बेकायदेशीर आहे, मात्र या भागात अनेक ठिकाणी पिकांचं रक्षण करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. ही घटना पलक्कड जिल्ह्यात घडली आहे, मलप्पुरममध्ये नाही. तसंच या प्रकरणी फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली आहे. असं तो म्हणाला आहे.







