पुणे (वृत्तसंस्था) – बेल्हे, निसर्ग चक्रीवादळात जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद, माध्यमिक शाळा व आश्रम शाळांचे एकूण ४४ लाख २० हजार रुपयांचे नुकसान केले आहे. नुकसान झालेल्या शाळांची पाहणी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी पी.एस.मेमाणे यांनी केली आहे.
तालुक्यातील जि.प.प्राथ.शाळा खडकुंबे, चिंचेचीवाडी, निमगिरी, तळ्याचीवाडी, बारकी वसईवाडी, बोरीची वाडी,कवटेवाडी,बगाड वाडी,गोळेगाव, आळू, मुथाळणे, धावशी,सोमतवाडी, चिंचोली, डिंगोरे आशा जिल्हा परिषद शाळा तसेच माध्यमिक शाळा व काही आश्रम शाळा यामध्ये आपटाळे हायस्कूल,
शितळेश्वर विद्यालय सितेवाडी, शासकीय आश्रम शाळा अंजनावळे, आश्रम शाळा तळेरान, सरस्वती विद्यालय उदापूर या शाळांचे चक्रिवादळात शाळेचे छतांचे पत्रे व किचनशेडचे पत्रे उडाले. तसेच शाळेतील काही शैक्षणिक साहित्याचेही नुकसान झाले. अशी माहिती जुन्नर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी पी.एस.मेमाणे यांनी दिली आहे.