पुरी (वृत्तसंस्था) – येथील प्रख्यात जगन्नाथ देवस्थानामध्ये भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचा स्नान पोर्निमा सोहोळा संपन्न झाला.
भहवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांना स्नान घालण्याची ही परंपरा आहे. 12 व्या शतकापासून सुरू असणाऱ्या या कार्यक्रमाला इतिहासात प्रथमच या सोहोळ्याला भाविक अनुपस्थित होते. मात्र या सोहोळ्यावेळी पुजाऱ्यांनी मास्क परिधान केलेले नव्हते. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सेवेकऱ्यांची करोना चाचणी घेण्यात आली होती. पहाटे पावणे दोनच्या सुमारास या सोहळ्याची सुरवात झाली. त्यात भगवंताला सुगंधी पाण्याने 108 वेळा स्नान घालण्यात आले. यावेळी विधिवत मंत्रोच्चरण सुरू होते.