पाचोरा ( प्रतिनिधी )- येथील गिरड रोड वरील सबस्टेशन मध्ये आज सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास फिडर ओवर हेड विजेचा लोडआल्याने तार तुटून पडल्याने त्यात स्टेशनमध्ये कर्मचाऱ्यांची निवासस्थाने ओस अवस्थेत पडलेले असल्याने आजूबाजूला गवत व झाडे झुडपे वाढलेले असल्याने आगीचा भडका झाल्याने तेथील सेवा बजावणारे दोन कर्मचारी व सुरक्षारक्षक यांच्या लक्षात ही बाब आल्याने तेथील फायरफायटरचा वापर करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही घटना कडल्यानंतर पाचोरा येथील नगरपालिकेच्या अग्निशमन बंब मागून तासाभरात ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला असून त्यात वीज वितरण कंपनीचे सब स्टेशनमधील कुठलीही आर्थिक नुकसान व जीवितहानी झाली नसल्याचे पारेषण विभागातील वितरण कंपनीचे अधिकारी साळुंखे यांनी ही माहिती दिली.