जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या कठीण परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, नर्स,आणि इतर स्टाफ हा सैनिकांच्या रुपात लढत आहे. या वैद्यकीय क्षेत्रातील सैनिकांसाठी आर्या फौंडेशन ही संस्था पुढे सरसावली आहे. या संस्थेकडून पीपीइ किट ,एन- ९५ मास्कची ऑर्डर देण्यात आली आहे, त्यासाठी एक लक्ष पन्नास हजार रुपये संस्थेने संबंधित वितरकाला दि.३ एप्रिल रोजी इ बँकिंग द्वारे अदा केले आहे. सदरील किट, मास्क हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथील कोरोना वॉर्ड आणि ओपीडीमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टर, आणि त्यांच्या चमुला देण्यात येणार आहे. कोरोना विरुद्धचा हा लढा सरकार किंवा कोणतीही संघटना स्वबळावर लढू शकणार नाही त्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. या लढ्यात जळगाव जिल्ह्यातील दानशूरांनी पुढे यावे आणि या सेवाकार्यात मदतीचा हात द्यावा, असे आवाहन आर्या फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी केले आहे. मदत करू इच्छिणाऱ्यांनी आर्या फौंडेशन, जानकी नगर, नेरी नाका येथील कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा खाली दिलेल्या खात्यात आपली मदत पोहचवावी. आर्या फौंडेशन – खाते क्र.१९५८०२०००००३०३ ; बँक ऑफ बदोडा ,रिंग रोड, जळगाव., आपण दिलेली मदत ही इनकम टॅक्स कायदा 80 G नुसार सूट मिळणेस पात्र राहील, असे डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी कळविले आहे.