मुंबई (वृत्तसंस्था) – आशियातील सर्वात मोठी वस्ती असलेल्या मुंबईतील धारावीत परिसरात कोरोना व्हायरसची आणखी दोन प्रकरणे समोर आली आहेत. धारावीत आतापर्यंत 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. नवीन बाधित रुग्णामध्ये 30 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर दुसरा 48 वर्षीय व्यक्ती याच झोपडपट्टीत राहणारा आहे. मुंबईच्या धारावी परिसरात कोरोनाचा शिरकाव होणे ही मोठी चिंतेची बाब आहे धारवीत कोरोनाचा शिरकाव होणे मुंबईसाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे. पहिला कोरोना बाधित रुग्ण 1 मार्चला आढळून आल्यानंतर लगेच 2 मार्चला धारावीत दुसरे प्रकरण समोर आले होते. आतापर्यंत याठिकाणी 5 जणांना कोरोनाची लागण झाली असून एका जणाचा मृत्यू झाला आहे.