नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – अहमदनगर जिल्हात कोरोनाचा धोका दिवसंदिवस वाढत चालला आहे. आज 3 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठविलेल्या 73 स्त्राव चाचणी नमुन्याचे अहवाल आज आले. त्यात तीनजण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात नगर शहरातील दोन जण तर राहाता तालुक्यातील लोणी येथील एकाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या आता वीसवर गेली आहे. बाधित आढळलेल्या व्यक्तीमध्ये नगर शहरातील एक व्यक्ती 76 वर्षीय तर दुसरी व्यक्ती 35 वर्षीय आहे. लोणी येथील व्यक्ती 46 वर्षीय आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने यांना लागण झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी सांगितले.