मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात करोनाबाधितांचा आकडा सतत वाढतच असून आज औरंगाबादमध्ये ५ नवे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये २ वर्षाची आणि ७ वर्षाच्या चिमुरडीचा समावेश आहे. यामुळे राज्यात एकूण संख्या ६६१ झाली आहे. माहितीनुसार, औरंगाबादमध्ये आज 5 नवे कोरोना रुग्ण आढळले. यातील 2 घाटी रुग्णालय, 2 मिनी घाटी रुग्णालय व 1 धुत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.