नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ झाली असून संसर्ग झालेल्यांची संख्या तीन हजारापेक्षा जास्त आहे. तर 75 जणांना प्राण गमवावे लागले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 2787 लोकांना संसर्ग झाला असून त्यातील 212 जण बरे झाले आहे.
भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषदेने (आईसीएमआर) दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 79,950 जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 3113 जणांना संसर्ग झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 24 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर गुजरातमध्ये 10, तेलंगणा 7, मध्य प्रदेश आणि दिल्लीत 6, पंजाबमध्ये 5, कन्राटक आणि पश्चिम बंगाल मध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आंध्रप्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 490 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असून दिल्लीत 445, तामिळनाडूत 411 रूग्ण आढळले आहे. महाराष्ट्र- 490, दिल्ली- 445, तामिळनाडू-411, केरळ- 295, राजस्थान- 200, उत्तर प्रदेश- 174, आंध्रप्रदेश- 161, तेलंगणा- 159, कर्नाटक- 128, गुजरात- 105, मध्यप्रदेश- 104, जम्मू काश्मिर- 75, पश्चिम बंगाल- 69, पंजाब- 57, हरियाणा- 49, बिहार- 30, चंदीगढ- 18, उत्तराखंड- 16, लडाख- 14, जगभरात कोरोनामुळे बळी पडलेल्यांची संख्या 65 हजारावर गेली आहे. आतापर्यंत जगभरात 12 लाखापेक्षा अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जगात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून आतापर्यंत 190 देशांमध्ये पसरला आहे, आतापर्यंत कोरोनाचे 2 लाखाहून अधिक रूग्ण बरे झाले आहे. सध्या जगात नऊ लाख जण कोरोनाबाधित असून त्यातील पाच टक्के म्हणजे 42, 288 रूग्ण गंभीर आहे.