जळगाव शहरातील दूध फेडरेशनजवळची घटना
जळगाव (प्रतिनिधी) : येथील छत्रपती शिवाजीनगर परिसरात दूध फेडरेशनजवळ भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळून जखमी झालेल्या तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दि. १८ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशन येथे प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अभिषेक हरिप्रसाद शर्मा (वय २१, रा. आहुजा नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. अभिषेक हा एका इलेक्ट्रिक दुकानात काम करीत होता. तर अभिषेकचे वडील हरिप्रसाद हे हातमजुरी करून परिवाराचा उदारनिर्वाह करीत आहेत.(केसीएन)दरम्यान, अभिषेक हा त्याचा मित्र पवन कोळी यांचेसह रविवारी दि. १७ रोजी ७ वाजता घरून जळगावात छत्रपती शिवाजीनगर परिसरात आला असताना दूध फेडरेशन परिसरात त्याची भरधाव दुचाकी दुभाजकाला जोरात धडकली. यात अभिषेकला जबर मार लागल्याने जळगाव खुर्द येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
तर पवन कोळी हा किरकोळ जखमी झाला होता. दरम्यान, अभिषेक शर्मा याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना सोमवारी रात्री ११ वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.(केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनकामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दाखल करण्यात आला होता. घटनेप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशन येथे प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेने आहुजा नगर येथे शोककळा पसरली आहे.