मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावामध्ये दोन महिलांना प्रेमाचे आमिष दाखवून नराधमाने त्यांना व्हिडिओ कॉल करीत त्यांचे नग्न व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि समाज माध्यमावर व्हायरल केले. याबद्दल मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावामध्ये दि. २५ एप्रिल रोजीचे पूर्वी संशयित आरोपी श्रीकृष्ण अनिल चिखलकर याने ३६ वर्षीय फिर्यादी महिलेला दबाव टाकून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला फोनवर व्हिडिओ कॉल करून तिला विवस्त्र होण्यास सांगून तिचा व्हिडिओ रेकॉर्ड केला.(केसीएन)तसेच आणखी एका तरुणीला देखील प्रेमाच्या जाळ्यात ओढून दबाव टाकत विवस्त्र व्हिडिओ बनवला. हे व्हिडिओ समाज माध्यमांवर संशयित आरोपीने व्हायरल केले आहे. याबाबत कळताच ३६ वर्षीय फिर्यादी महिलेने मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते करीत आहेत.