जळगाव तालुक्यातील पाथरी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाथरी येथील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी घडली आहे. याप्रकरणी माहेरच्या मंडळींनी घातापाताचा आरोप केला असून तिच्या पतीनेच विष देऊन मारले असल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शितल दीपकसिंग पाटील (वय २८) असे मयत विवाहितेचे नाव आहे. तिचा पाथरी येथील दीपकसिंग पाटील यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना एक सहा वर्षाची मुलगी देखील आहे. माहेरच्या नातेवाईकांनी माहिती दिली की, शितल पाटील हिला पती दीपक नांदवत नव्हता. तर तिला नवरा, सासू, दोन नणंद हे छळ करायचे. सासरा देखील मारहाण करीत होता. अशा परिस्थितीत गेल्या तीन वर्षापासून ती माहेरी वरसाळा येथे राहत होती. दरम्यान शुक्रवारी ९ फेब्रुवारी रोजी पती दीपकसिंग याने मयत शितल हिचे वडिलांना शितलला घेऊन येण्यास सांगितले.
शितलच्या वडिलांनी शितल आणि तिच्या मुलीला पाथरी येथे नेले असता, आज शितलला येथेच राहू द्या म्हणून पती दीपकसिंग याने शितलला ठेवून घेतले. संध्याकाळी सात वाजता सुमारास शितलच्या वडिलांना शितलला आणले असल्याची माहिती मिळाली. तेथे तिचा मृत्यू झाल्याचे त्यांना कळाले.
त्यानंतर शितलच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनला घडण्याची माहिती मिळताच् त्यांनी घटनास्थळी धावं घेतली. एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. शितलच्या माहेरच्या मंडळींनी सासरच्या मंडळींवर घातपाताचे आरोप केले आहेत.