जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी फाऊंडेशन सदस्या तथा आय एम ए महिला विंग सचिव डॉ केतकी ताई पाटील यांनी २९ व ३० एप्रिल २०२३ रोजी लोणावळा येथे इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र स्टेटतर्फे आयोजित ऑर्गनायझेशनल एक्ससेलेन्स आणि ओरीऐंटेशनल प्रोग्रॅम मध्ये सहभागी होऊन आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे आयएमए अध्यक्ष डॉ रवींद्र कुटे, सचिव डॉ संतोष कदम यांच्यासह आयएमए महिला विंग तर्फे डॉ केतकी ताई यांचे स्वागत व सहभागाबद्दल मानाची शाल व सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.