जळगाव (प्रतिनिधी ) – द इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजीच्यावतीने २२ ते २५ सप्टेंबर दरम्यान घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ.अंकिता पाटील हिला यंग नेफ्रॉलॉजीस्ट ॲवॉर्ड प्राप्त झाला आहे.
संसर्ग आणि किडनी या विषयावर नवीदिल्ली येथे आंतरराष्ट्रीय परिषद झाली. यामध्ये देशातील १४० किडनी विकार तज्ञांनी आपले शोधनिबंध सादर केले. यामध्ये मूलभूत विज्ञान आणि क्लिनीकल विज्ञान या वर्गवारीत दोन शोधनिबंधांना पुरस्कार प्राप्त झाले. मूलभूत विज्ञान यामध्ये यंग नेफ्रॉलॉजीस्ट ॲवॉर्डव्दारे अंकिताला सन्मानीत करण्यात आले. दिल्ली येथील द जॉर्ज इंन्स्टिटयूट फॉर ग्लोबल हेल्थ येथील कार्यकारी संचालक विवेकानंद झा आणि जोहान्सबर्ग, दक्षिण अफ्रिका येथील विटवॅटर्ससॅन्ड विद्यापीठातील किडनी विकार तज्ज्ञ सरलादेवी नायकर यांच्याहस्ते अंकिताला पुरस्कार देण्यात आला. अंकिता ही सध्या सेंट जी.एस.मेडीकल कॉलेज व केईएम हॉस्पीटल मुंबई येथे नेफ्रॉलॉजी विभागात सहायक प्राध्यापक म्हणून काम करीत आहे. जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील अंजाळा हे तिचे मूळ गाव असून बंगळुरुच्या इंडियन इन्स्टिटयूट मधील सेवानिवृत्त प्रा. दिलीप पाटील यांची कन्या व कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांची पुतणी आहे. तिच्या या यशा बद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.