मुंबई (वृत्तसंस्था) – राज्याच्या आर्थिक राजधानीत कोरोना व्हायरसने मोठा कहर केला आहे. आज मुंबईत कोरोनाची लागण झालेले तब्बल 441 नवीन रुग्ण आढळून आले असून दिवसभरात 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 8 हजार 613 वर गेली आहे. तसेच आतापर्यंत 1804 रुग्ण या आजारातून बरे झाले आहे. मुंबईत कोरोनाची दिवसेंदिवस वाढणारी संख्या ही महाराष्ट्रासाठी मोठी चिंतेची बाब मानली जात आहे. मुंबईत एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येणाचे कारण म्हणजे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात तपासण्या करण्यात येत आहे. शिवाय आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील धारावी परिसरात कोरोनाचा शिरकाव होणं हे सुद्धा मोठं कारण आहे.
हे सुद्धा वाचा :- चिंताजनक ! देशभरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 2 हजार 487 नवीन रुग्ण, 83 जणांचा मृत्यू







