सांगली (वृत्तसंस्था) – जिल्ह्यात आणखी एक 35 वर्षीय रुग्ण कोरोनाबाधित आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. सदरील व्यक्ती कर्नाळ गावातील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसात हा व्यक्ती सातारा येथे गेले होता. तेथे त्याची भेट मुंबईवरुन परतलेल्या त्याच्या मावसभावासोबत झाली होती. त्यानंतर हा व्यक्ती परत सांगलीमध्ये आला असता त्याची कोरोना तपासणी करण्यात आली. दरम्यान आज या व्यक्तीचे कोरोना तपासणी अहवाल प्राप्त झाले असून त्यात त्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आज आढळून आलेल्या या रुग्णानं जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 34 वर पोहचली आहे.







