औरंगाबाद (वृत्तसंस्था) – शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढत होताना दिसत आहे. आज सकाळी पुन्हा 9 कोरोना बाधीत शहरात आढलळले. यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या ही 300 च्या जवळपास पोहोचली आहे. शहरात आता 292 कोरोना बाधीत सापडले आहेत. यामधील 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
आज सकाळी सापडलेल्या कोरोना रुग्णांमध्ये नंदनवन कॉलनी 1, देवळाई 1, पुंडलिकनगर 2, भीमनगर 3, किलेअर्क 1, सावित्री नगर, चिकलठाणा 1 अशी रुग्ण संख्या आहे. यामुळे औरंगाबादकरांची चिंता दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. दरम्यान 10 जणांचा शहरात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.