मुंबई (वृत्तसंस्था) – बॉलिवूड अभिनेता आमिर खानने सोशल मीडियावर त्याच्यासंदर्भात पसरत असलेल्या अफवांबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आमिर खानने आपल्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये आमिरने त्याच्याबाबत अनेक अफवा पसरवल्या जात असल्याचं सांगितलं आहे.
बॉलिवूड अभिनेता आमिर खानने ट्विटरवरून एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमधून त्याने त्याच्याविरोधात पसरवल्या जाणाऱ्या खोट्या अफवांचं खंडन केलं आहे. आमिर खानने सध्या चर्चेत असणाऱ्या सर्व गोष्टी अफवा असल्याचं सांगितलं आहे. यांदर्भात आमिर आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला की, ‘मी पिठाच्या पिशव्यांमध्ये पैसे टाकून पाठवणारा व्यक्ती नाही. त्यामुळे कदाचित ही बातमी खोटी किंवा अफवा आहे. किंवा कोणी रॉबिनहुड असेल, ज्याला आपल्या नावाचा खुलासा करायचा नसेल, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, लव्ह यू.’