मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. अनेक रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान मुंबईमध्ये डॉक्टरकडून कोरोनाग्रस्तासोबत गैरव्यवहार केल्याची घटना घडली आहे. वॉकहार्ट रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार समोर आला. डॉक्टरने कोरोना रुग्णासोबत अश्लील वर्तन केल्याची घटना घडली. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
आरोपी डॉक्टरला कामावरून काढून टाकण्यात आले आहे. आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आग्रीपाडा पोलिसांनी अद्याप त्याला अटक केली नाही कारण रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यालासुद्धा लागण झाल्याची भीती आहे. सध्या आरोपी डॉक्टर क्वारंटईनमध्ये असून त्याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 एप्रिल रोजी या डॉक्टरची रुग्णालयात नेमणूक झाली होती. दरम्यान कामाच्या दुसऱ्याच दिवशी त्याने हा गंभीर गुन्हा केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.