• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉक्‍टरचे रुग्णालयातून दहा लाखांच्या खंडणीसाठी अपहरण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 4, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी मारहाण करून डॉक्‍टरचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार भेकराईनगर हडपसर येथील हरपळे क्‍लिनिकमध्ये घडला. या डॉक्‍टरकडून आरोपींनी सात लाख रुपयांची रक्कमही उकळली. गर्भलिंग निदाण चाचणी केली नसतानाही ती केल्याचे धमकावत ब्लॅकमेलिंग करण्यात आले होते. धक्‍कादायक म्हणजे, आरोपींमध्ये एक स्वयंघोषित पत्रकार आणि पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात दोन महिला, प्रदीप फासगे (37, रा. प्रिझम सोसायटी, मांजरी), कैलास अवचिते (38, रा. महात्मा फुले वसाहत, हडपसर), समीर थोरात (रा. हडपसर) आणि अनोळखी व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. मधुकर चंद्रकांत शिंदे (वय 48, रा. चंद्रपार्क, श्रद्धानगर कोंढवा, मूळ-फलटण) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार दि.29 ते 31मे या कालावधीत घडला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) बच्चनसिंग, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने केली. हडपसर पोलीस संबंधित प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉक्‍टर शिंदे हे स्त्री रोगतज्ज्ञ आहेत. ते मागील तीन वर्षांपासून ते येथील एका खासगी दवाखान्यात प्रॅक्‍टिस करतात. एका महिलेने त्यांच्याशी मोबाइलवर वारंवार संपर्क साधून ‘वैद्यकीय तपासणीचे काम आहे,’ असे सांगितले. यासाठी त्यांची खडी मशीन चौकात एकदा भेटदेखील झाली. ही महिला रविवारी तपासणीसाठी रुग्णालयात आली. त्यावेळी तिने डॉक्‍टरांना ‘मला मुलगा हवा असून, माझी गर्भलिंगनिदान चाचणी करा’ असे सांगितले.

त्यावेळी शिंदे म्हणाले, ‘तुम्ही गर्भवती नसतानाही चाचणी करा, असे कसे म्हणता?’ महिलेला समजावत असतानाच तिने आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी महिलेच्या नवऱ्याने डॉक्‍टरांना केबिनध्ये येऊन पकडले. घाबरुन शिंदे याच्या तावडीतून सुटका करत केबिनबाहेर आले असता, रुग्णालयाचे मुख्य दार बंद होते. त्याचवेळी तिघा अज्ञात व्यक्तींनी रुग्णालयात प्रवेश केला. त्यांनी ‘तुम्ही डॉक्‍टर आहात. गर्भलिंगनिदान चाचणी कशी करता?’ असा जाब विचारला. त्यांनी ‘पोलिस आहोत’ असे सांगत डॉक्‍टरला धमकावले. ‘आमचे साहेब येईपर्यंत तुम्ही तुमच्या केबिनमध्ये गप बसा नाही, तर आरडाओरडा केला तर जीवे ठार मारेल’ अशी धमकीही दिली. या प्रकारामुळे रुग्णालयाचे संचालक व फिर्यादी घाबरले होते.

दरम्यान, तपासणीसाठी आलेल्या महिलेने त्यांना ‘हे प्रकरण मिटवायचे असेल, तर दहा लाख रुपये द्यावे लागतील’ असे सांगितले. त्यानंतर आरोपी महिला, तिचा नवरा व इतर तिघांनी डॉ. शिंदे यांना जबरदस्ती एका चारचाकी गाडीत बसविले. यावेळी संबंधित संचालक देखील सोबत होते. त्यांना सासवड रोडलगतच्या एका कार्यालयात नेण्यात आले. बुलेटवरून आलेले तिघेजणदेखील यावेळी तेथे आले होते.


 

 

Previous Post

शिरूर येथील युवकाच्या अपहरण प्रकरणी महाराजासह दोघांवर गुन्हे

Next Post

विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज सादर करण्यासाठी ८ जून पर्यंत मुदतवाढ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज सादर करण्यासाठी ८ जून पर्यंत मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
1xbet russia

मैदानी चाचणीसाठी गैरहजर उमेदवारांना अखेरची संधी !

February 19, 2026
रात्री १२ नंतर कॅटरिंग सेवा बंद, लवकरच घेणार निर्णय
1xbet russia

रात्री १२ नंतर कॅटरिंग सेवा बंद, लवकरच घेणार निर्णय

February 19, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

व्यवसायिकाच्या घरातून ५ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल लंपास

February 19, 2026
पिंगळवाडे येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जैन कंपनी

पिंगळवाडे येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन

मैदानी चाचणीसाठी गैरहजर उमेदवारांना अखेरची संधी !

February 19, 2026
रात्री १२ नंतर कॅटरिंग सेवा बंद, लवकरच घेणार निर्णय

रात्री १२ नंतर कॅटरिंग सेवा बंद, लवकरच घेणार निर्णय

February 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon