मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 490 वर पोहचला असून आतापर्यंत कोरोनामुळे 26 जणांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यात 67 नवीन बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यातील 43 रुग्ण मुंबई,10 रुग्ण मुंबई परिसरातील,पुण्यात 9 रुग्ण तर अहमदनगर जिल्ह्यातील 3 रुग्ण,वाशिम व रत्नागिरी येथे प्रत्येकी 1 रुग्णांची नोंद झाली आहे.यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 490 झाली आहे.
राज्यात आज कोरोनाबाधित ६७ नवीन रुग्णांची नोंद झाली.त्यातील ४३ रुग्ण मुंबई,१० मुंबई परिसरातील,पुणे येथील ९ तर अहमदनगर जिल्ह्यातील ३ रुग्ण,वाशिम व रत्नागिरी येथे प्रत्येकी 1 रुग्णांची नोंद झाली आहे.यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४९० झाली आहे.
कोरोनाच्या दहशतीने सगळ्यांनाच हादरवून टाकले आहे. कोरोनाबाबत खबरदारी म्हणून राज्य सरकार मोठे प्रयत्न करत असल्याचे दिसून आहे. तरीसुद्धा आतापर्यंत 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या 26 जणांमध्ये 6 मृत्यू आज झाले आहे. त्यातील मुंबईत 2 तर बदलापूर, वसई, जळगाव, ठाणे आणि पुण्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.