जळगाव (प्रतिनिधी) – भाजपच्या महानगर शाखेची तब्बल ९० सदस्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यात सर्वसमावेशकतेचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येत आहे. भाजप जिल्हा महानगराध्यक्षपदी दीपक सूर्यवंशी यांची नियुक्ती झाल्यानंतर उर्वरित कार्यकारिणीची घोषणादेखील करण्यात आली आहे. यात १० उपाध्यक्ष, ४ सरचिटणीस तर ९ जणांना चिटणीस या पदांवरसंधी देण्यात आली आहे. या उपाध्यक्षपदी- नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, माजी महापौर सीमा भोळे, सुनील माळी, प्रदीप रोटे, अमित भाटिया, लीलाधर ठाकरे, शरीफा रहेमान तडवी, सुभाष सोनवणे, सुशील हासवाणी, चंदन महाजन यांचा समावेश आहे. सरचिटणीसपदी- नगरसेवक विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशी व नितीन इंगळे यांना संधी देण्यात आली आहे. चिटणीसपदी – वंदना भगवान पाटील, राजेंद्र मराठे, राहुल वाघ, ज्योती जगन्नाथ निंभोरे, प्रतिभा सुधीर पाटील, महेश रतन चौधरी, नील संजय पाटील, भगतसिंग निकम, विठ्ठल पाटील यांचा समावेश आहे. महानगर विधानसभा क्षेत्रप्रमुखपदाची जबाबदारी दीपक साखरे यांच्याकडे कायम ठेवली आहे. कोषाध्यक्षपदी जीवन अत्तरदे, प्रसिद्धी प्रमुखपदी मनोज भांडारकर, कार्यालयमंत्री प्रकाश पंडित, सहकार्यालय मंत्री शोभा कुलकर्णी तसेच सोशल मीडिया प्रमखपदी महेश ठाकूर, सोशल मीडिया सहायक अक्षय चौधरी यांची निवड केली आहे. दरम्यान, या कार्यकारिणीत ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे माजी महानगराध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यावर सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.