पाचोरा ( प्रतिनिधी ) — पाचोरा शहर शिवसेनेकडून नागरिकांच्या सार्वजनिक समस्या जाणून घेण्यासाठी शिवसंवाद अभियान सुरु करण्यात आले आहे

नगरपालिकेअंतर्गत शहरात विविध ठिकाणी विकास कामे सुरू आहेत अनेक कामे प्रस्तावित आहेत तरीदेखील नागरिकांच्या समस्या बाकी असतील तर त्या सोडवणुकीच्यादृष्टीने जनतेशी हितगुज करता यावे या हेतूने शहर शिवसेनेच्यावतीने शहरात प्रभागनिहाय शिवसंवाद अभियानाची सुरुवात करण्यात आली अभियानाचे नेतृत्व मुकुंद बिलदीकर करणार असून प्रभाग एक व दोन येथे पालिकाअंतर्गत कामांशी संबंधित समस्या जाणून घेण्यासाठी बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.
सोमवारी आ.किशोर पाटील यांचे अध्यक्षतेखाली प्रभाग क्रमांक एकमधील नागरिकांशी संवाद झाला यावेळी मुकुंद बिलदीकर, शहर प्रमुख किशोर बारावकर, मनोज पाटील, प्रवीण ब्राह्मणे, जगन निकम, शांताराम खैरे आदींची उपस्थिती होती.यावेळी जगन निकम यांचेसह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला आमदार किशोर पाटील यांनी शिरपूरप्रमाणे पाचोरा पॅटर्न यापुढे राज्यात चर्चेत येईल अशा पद्धतीने विकासकामांचे नियोजन सुरू असल्याचे सांगितले.

मंगळवारी प्रभाग क्रमांक दोनमध्ये मुकुंद बिलदीकर यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन समस्यांचा पाढा वाचला, शिवसेनेच्यावतीने या सर्व समस्या लिहून घेण्यात आल्या मुकुंद बिलदीकर यांनी आमदार किशोर पाटील व नगरपालिकेच्यावतीने प्रभागासाठी करण्यात आलेल्या कामांवर प्रकाश टाकला सर्व समस्यांवर पंधरा दिवसात तोडगा काढून समस्या सोडविणार असल्याचे सांगितले
.यावेळी माजी जेष्ठ नगरसेवक रसूल उस्मान, शहर प्रमुख किशोर बारावकर, लतीफ खान, माजी नगरसेवक अय्युब बागवान, डॉ. भरत पाटील, शाकिर बागवान ,जावेद शेख, प्रवीण ब्राम्हणे , सलीम शेख, युवासेना शहरप्रमुख संदीपराजे पाटील यांचेसह नागरिकांची मोठी गर्दी होती. सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन साजिद कुरेशी यांनी केले.







