चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथे मिशन समजून आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने भाजपा, ब्राह्मणशेवगे व आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने जम्बो लसीकरण शिबीर झाले. पहिल्या व दुसऱ्या डोससाठी ४०० कोविशील्ड लसी उपलब्ध झालेल्या होत्या.

सोमवारी दुपारी अडीच वाजेपर्यतच गावातील लसिकरण पूर्ण झाले होते ब्राम्हणशेवगे येथील जि.प.प्राथमिक शाळेत लसिकरण करण्यात आले. आरोग्य उपकेद्राचे अधिकारी व कर्मचारीतर्फे उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल जलमित्र सोमनाथ माळी यानी पारीजातकाचे रोप भेंट देऊन आभार मानले. नागरिकाची ऑनलाइन नोदणीसाठी ब्राम्हणशेवगे येथील आकाश पाटील, बंटी पाटील, मयूर बाविस्कर, अतुल पाटील, विशाल नेरकर, गणेश पवार, लोकेश माळी, प्रदीप बाविस्कर,ज्ञानेश्वर राठोड, विष्णू राठोड, सुभाष बाविस्कर, नानाभाऊ चव्हाण, प्रमोद देसले, निलेश खैरे यांनीं परिश्रम घेतले.
प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगावचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सय्यद याचे मार्गदर्शनाखाली ब्राम्हणशेवगे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे डॉ. सागर चव्हाण, आरोग्य सेविका सोनाली पाटील, आशा सेविका मंगल पवार, मदतनिस सोनाली पाटील यानी परिश्रम घेतले. भाजपाचे शांताराम नेरकर, रत्नाकर पाटील, पोलिस पाटील राजेंद्र माळी याचे प्रयत्नातून हे लसीकरण झाले.







