जळगाव ( प्रतिनिधी ) – हरिविठ्ठलनगर भागातील मुकूंदनगर माहेर असलेल्या विवाहितेचा छळ करणार्या जीवननगरातील पतीसह सासरच्या तिघांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हरिविठ्ठल नगर येथील वनिता सोनवणे यांचा रामानंदनगर जवळच्या जीवननगरातील किशोर दत्तात्रय सोनार यांच्यासोबत विवाह झाला लग्नानंतर काही महिन्यांनी वनिता हिला पतीसह सासरच्यांनी विविध कौटुंबिक कारणांवरुन वेळावेळी मारहाण करुन तसेच क्रूर वागणूक देत मानसिक व शारिरीक छळ केला. या छळाला कंटाळून वनिता माहेरी निघून गेल्या. वनिता सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पती किशोर सोनार, सासू विमलबाई दत्तात्रय सोनार व विनोद दत्तात्रय सोनार या तीन जणांविरोधात रामानंदनगर पेालिसात गुन्हा दाखल झाला पुढील तपास पो ना प्रशांत पाठक करीत आहे.








