लाखोंचा मुद्देमाल खाक ; दोन अग्निशमन बंबानी आग आटोक्यात

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील एमआयडीसी पोलिस स्टेशन समोर असलेल्या आदर्श इंडस्ट्रीज कंपनीला आज सायंकाळी सव्वा सहा वाजता शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत लाखोंचा मुद्देमाल जळून खाक झाला.या आगीवर दोन अग्निशामक बंबांनी आग आटोक्यात आणली. तसेच यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलीस स्टेशन समोर आदर्श इंडस्ट्रीज कंपनी येथे गोडाऊन मधील लाकडाला आग सायंकाळी ६:१५ वाजता लागली. या आगीत सर्व मुद्देमाल जळून खाक झाला आहे. अग्निशमन बंबानी आग आटोक्यात आली कर्मचारी- वाहन चालक देविदास सुरवाडे, रोहिदास चौधरी,भगवान पाटील,हिरामण बाविस्कर,वसंत कोळी,वाहन चालक- संतोष तायडे,नितीन बारी यांनी आग आटोक्यात आणली.शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

याबाबत केसरीराजशी बोलताना आशीष लाहोटी यांनी सांगितले की आग ही शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचा अंदाज लावला जात आहे.








