एरंडोल (प्रतिनिधी) – येथील माहेर व सासर असलेल्या ज्योत्स्ना हितेश महाजन वय २२ वर्ष या विवाहितेचा माहेरून पैसे आणावेत या मागणीसाठी सासरच्या मंडळींनी वेळोवेळी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन सूत्रांनी दिलेली माहिती अशी की ज्योत्स्ना हिचा विवाह २८ डिसेंबर २०१७ रोजी एरंडोल येथील हितेश गोविंदा महाजन यांच्याशी विवाह झाला होता. त्यांच्या संसारवेलीवर सोळा महिन्याचा एक मुलगा आहे.
ज्योत्स्ना ही पती सोबत लक्ष्मी नगर अंबरनाथ येथे नांदत असताना दारू पिऊन तिला मारहाण होत होती. तसेच तिला अपमानास्पद वागणूक देऊन माहेरहून पैसे आणावेत, लग्नात कमी हुंडा दिला होता. या कारणास्तव वेळोवेळी शिवीगाळ दमदाटी व मारहाण करण्यात आली.
याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. हितेश गोविंदा महाजन, शोभाबाई गोविंदा महाजन, गोविंदा विश्राम महाजन, पुनम चंदु महाजन, चंदू मन्साराम महाजन यांचा आरोपींमध्ये समावेश आहे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल सुनील लोहार व पोलीस नाईक अनिल पाटील हे पुढील तपास करीत आहेत.







