पारोळा (प्रतिनिधी) – पारोळा तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने बलिप्रतिपदेच्या निमित्तीने *चक्रवर्ती सम्राट बळीराजा* यांचा प्रतिमापुजन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ बळीराजा प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आई जिजाऊ यांच्या जिजाऊ वंदना गायनाने कार्यक्रमाची सुरुवात होऊन,

तालुक्यातील आदर्श शेतकरी “जिभाऊसो. पांडूरंग मडकू पाटील” यांच्या शुभहस्ते बळीराजा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मराठा सेवा संघाचेअध्यक्ष संदीप पाटील, शेतकरी संघटना ता.अध्यक्ष किशोर पाटील, जेष्ठ सल्लागार एन.
के.पाटील सर, मराठा गुणगौरव समितीचे अध्यक्ष रविंद्र पाटील सर, छावा ता. अध्यक्ष विजय पाटील, प्रताप पाटील, डॉ. योगेंद्र पवार ,भिकनराव पाटील, अशोक पाटील ,किशोर बी. पाटील, प्रमोद पाटील उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भुपेंद्र पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार गोरख सुर्यवंशी सरांनी मानले.







